शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सायकल दुकानाला भीषण आग!

By admin | Updated: March 3, 2017 20:23 IST

लाखोंचे नुकसान; पाटणी चौकातील घटना

वाशिम : येथील पाटणी चौकात असलेल्या रोहित सायकल स्टोअर्स दुकानाला गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत दुकानातील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.वाशिम येथील पाटणी चौकात रोहित चांदवाणी यांचे रोहित सायकल स्टोअर्स नावाचे सायकल विक्री आणि दुरुस्तीचे मोठे दुकान आहे. गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास शिंदे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर थोड्याच वेळाने आग लागली. थोड्याच वेळात या आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कदम घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष अशोक हेडा हेसुद्धा घटनास्थळावर दाखल झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि जवळपास दीड तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी या घटनेत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग कशामुळे लागली, त्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून अग्निशमन दलास ही आग आटोक्यात आणण्यास सहकार्य केले.या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, या प्रकरणी संपूर्ण तपासानंतरच आग लागण्याचे कारण कळू शकणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. आग एवढी भीषण होती, की या दुकानाला लागून असलेल्या मोबाइलच्या दुकानालाही आग लागून मोठे नुकसान झाले. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.