शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मनभा येथे भारिप-बमसं कार्यकर्ता मेळावा उत्साहात;  शेकडो बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:59 IST

 कारंजा (लाड) : बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८  फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले.              

ठळक मुद्देबहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी केले.     शेकडो भारिप बमसं पदाधिकरी,कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्य आंबेडकरी विचारसरणीचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सैय्यद आझम यांनी मानले.   

 कारंजा (लाड) : कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाकडे दलित व बहुजन कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे. संपूर्ण बहुजन समाज आज जागरूक झालेला असुन ,जागरूक समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८  फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले.              

भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये पक्षनिरक्षक एस.बी.खंडारे,डॉ.नरेश इंगळे,विजय मनवार,नगराध्यक्ष शेषराव ढोके,राजाभाऊ चव्हाण,न.प.गटनेता व शिक्षण सभापती  फिरोज शेकुवाले,न.प.उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, तालुकाध्यक्ष भारत भगत,नियोजन सभापती एजाज खान, जिल्हा प्रवक्ता हमीद शेख, शहराध्यक्ष देवराव कटके, युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बसपाचे बंडू इंगोले,रमेश नखाले, दीपक वानखड़े अ‍ॅड.भारत सावळे आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्ता सह भारिप बहुजन महासंघ मध्ये जाहिर प्रवेश केला . भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर व वाशीम जिल्हाध्यक्ष  मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारिप बमसं मध्ये प्रवेश करीत असल्याचे मत उपरोक्त मान्यवरांनी व्यक्त केले. या प्रसंगी नईम भाई मनभा यांनी सुद्धा प्रवेश केला. आपल्या मार्गदर्शनात पुंजानी पुढे म्हणाले की समाजातील सर्व बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हा मुख्य संकल्प असून त्या दिशेने भारिप बहुजन महासंघ वाटचाल करीत आहे. बहुजन समाजाने एकसंघ होऊन प्रस्थापित सत्तेला हद्दपार करणे  गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. दरम्यान बसपाला रामराम ठोकुन भारिप बमसं मध्ये प्रवेश करणारे बंदु इंगोले, रमेश नाखले व दीपक वानखड़े यांच्यासह सर्व प्रवेश करणाºया मान्यवरांचा मो. युसूफ पुंजानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बंडू इंगोले यानी भारिप बहुजन महासंघात प्रवेश करण्याचा उद्देश विशद केला. यावेळी पं.स.सदस्य प्रमोद लड़े, अ‍ॅड.धम्मानंद देवले, के.जी.ताटके, आसिफ कुरेशी,सरपंच वाहिद मिर्जा,दिलीप शेजव,संतोष शेजव,देवेंद्र कराळे,मोहन कदम,मधुकर वनारसे, देवराव सोनटक्के, अनिल राठोड,अशोक पाटिल टाके, गजानन ढेंगड़े, बबन वानखड़े,वसंतराव राठोड,विश्वनाथ आडोले,गणेश बागडे,दिगंबर पाडेन, प्रभुदास पाडेन,निर्मलाबाई इंगोले,मधुकर बोलके,सुनील रामटेके,संजय मनवर,माया निचड, रजनी धाकतोड़े,राजेंद्र रंगारी,संजय मनवर,विष्णु पाटिल,महादेवराव खडसे,भगवान जाधव,दुर्योधन मनवर सह शेकडो भारिप बमसं पदाधिकरी,कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्य आंबेडकरी विचारसरणीचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सैय्यद आझम यांनी मानले.   

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघKaranjaकारंजाPoliticsराजकारण