शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात भेट मिळालेली रक्कम दिली ‘बेटी बचाव’ अभियानाला!

By admin | Updated: May 30, 2017 01:41 IST

अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्यांचे स्तुत्य पाऊल : जिल्हाधिकाऱ्यांकडे रकमेचा धनादेश सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लग्नात भेट म्हणून मिळालेली रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला देऊन अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी आमदार लखन मलिक यांच्या उपस्थितीत अश्विनी व श्याम यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द केला.अश्विनी ही मंगरूळपीर येथील अशोक नगरमध्ये राहणाऱ्या सीताराम जमनूक यांची कन्या. तिचा विवाह कारंजा लाड येथील रामेश्वर घोडेस्वार यांचे पुत्र श्यामसोबत १४ मे २०१७ रोजी मंगरूळपीर येथे पार पडला. या वधू-वरांनी लग्नात भेट मिळणारी रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मदत म्हणून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार पाच हजार रुपयांचा धनादेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार लखन मलिक यांनी नवदाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच इतरांनीही या दाम्पत्याचा आदर्श घेऊन स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी बोलताना अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्याने सांगितले की, आईच्या गर्भातच मुलीची होणारी हत्या थांबली पाहिजे. याकरिता स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानात आमचाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने छोटीशी का होईना मदत देण्याचा आम्ही निर्धार केला. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा क्षण जीवनभर स्मरणात रहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यानुसार, लग्नात भेट मिळालेली रक्कम या अभियानाला मदत म्हणून दिल्याचे दोघांनीही सांगितले. यावेळी मुलीचे आई-वडील रूक्मिणी व सीताराम जमनूक यांच्यासह मंगरूळपीर नगर परिषदेचे शिक्षण समिती सभापती अनिल गावंडे, योगेश देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नीतेश मलिक, बंडू पाटील महाले, धनंजय हेंद्रे, सुनील तापडिया, प्रल्हाद गोरे, मदन पाटील, धनाजी सरसकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य विनोद मगर, गणेश ढेकणे आदी उपस्थित होते.