शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग’मध्ये वाशिम पोलीस दलाचे उत्कृष्ट कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:14 IST

वाशिम: संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात १ जानेवारी  २0१६ पासून ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँण्ड क्रिमिनल  ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीची अंमलबजावणी सुरू  करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाने उ त्कृष्ट कार्य केल्याप्रती पोलीस महासंचालकांच्या हस्ते  विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विशेष  पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मानपोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात १ जानेवारी  २0१६ पासून ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँण्ड क्रिमिनल  ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीची अंमलबजावणी सुरू  करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाने उ त्कृष्ट कार्य केल्याप्रती पोलीस महासंचालकांच्या हस्ते  विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विशेष  पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.‘सीसीटीएनएस’ प्रणालीअंतर्गत पोलीस विभागात चालणारी  दैनंदिन कामे, गुन्हे अन्वेषण, न्यायालयीन कामकाज  ‘ऑनलाइन’ करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात मूलभूत  सुविधांचा अभाव, ग्रामीण भागातील विजेचे भारनियमन,  इंटरनेट कनेक्टिव्हीटीमधील असुविधा आदी प्रतिकूल  बाबींवर मात करत जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील  यांनी जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर सीसीटीएनएस  कामकाजावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून त्यात जास्तीत  जास्त सुधारणा घडवून आणण्याकरिता कर्मचार्‍यांना प्रो त्साहित करण्यात आले. तसेच सीसीटीएनएसची अधिक  प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून जनतेमध्येदेखील  सिटीजन पोर्टलची प्रसिद्धी करण्यात आली. यास्तव शाळा व  महाविद्यालयात प्रबोधनपर शिबिरे घेण्यात आली. संगणक वापराकडे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना  आकर्षित करण्यासाठी सेवाकालीन प्रशिक्षण शिबिरे,  कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पोलीस स्टेशन  भेटीदरम्यान सीसीटीएनएस कामकाजाचा आढावा घेऊन प्र त्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. याचीच  फुलश्रृती  म्हणून  संपूर्ण महाराष्ट्रातून वाशिम जिल्हा तिसर्‍या क्रमाकांचा  मानकरी ठरला आहे. या कामगिरीबाबत १८ सप्टेंबर रोजी  पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते जिल्हा  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा पारितोषिक देऊन स त्कार करण्यात आला. सीसीटीएनएस कार्यप्रणाली यशस्वी  करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सायबर  सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख,  प्रदीप डाखोरे व  कर्मचारी अमोल काळमुंदळे, अश्‍विनी पन्नासे, कोमल गाढे,  विप्रो  कंपनीचे  प्रवक्ते राजेश शिकवाल यांनी परिश्रम घेतले.