शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात ऑफलाइन पद्धतीने मिळणार ‘मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’चा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:43 IST

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांना ऑनलाइनची जोड देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वस्तू स्वरूपात अनुदान न देता लाभार्थींच्या बँक खात्यात ...

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांना ऑनलाइनची जोड देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वस्तू स्वरूपात अनुदान न देता लाभार्थींच्या बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया लागू झाल्यापासून ‘शिष्यवृत्ती’ ही बाबदेखील या प्रक्रियेत समाविष्ठ करण्यात आली आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृ्त्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या ‘महा-डीबीटी’ संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने राबविणे क्रमप्राप्त आहे. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व कडक निर्बंधामुळे या योजनेच्या अंमलबजावणीचे आवश्यक प्रशिक्षण यंत्रणा पातळीवर घेण्यात आले नाही, तसेच शासनाच्या ‘महा-डीबीटी’ संकेत स्थळावर या योजनेसंबंधी आवश्यक डेटाबेस अद्याप समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२०-२१ या वर्षातील या योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना ऑफलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहे. ही योजना थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंंत वगळण्यात आली आहे.