शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समृद्धीसाठी वृक्षसमूह योजना लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

वाशिम : संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सुदिक्षा हरदेव यांनी शहरी वृक्षसमूह योजना देशभर कार्यान्वित केली. पर्यावरण समृद्धीसाठी या ...

वाशिम : संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सुदिक्षा हरदेव यांनी शहरी वृक्षसमूह योजना देशभर कार्यान्वित केली. पर्यावरण समृद्धीसाठी या योजनेचा मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती संत निरंकारी मिशनच्या औरंगाबाद विभागाचे झोनल इन्चार्ज कन्हैय्यालाल डेबरा यांनी दिली.

स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या वन-नेस-वन शहरी वृक्ष समूह योजना प्रकल्पास कन्हैय्यालाल यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कर्मचारी गोरख इढोळे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

संत निरंकारी मिशन वाशिम शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २० गुंठे जागेवर वृक्षलागवडीची मोहिम निरंकारी सेवादलाने हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे कार्याला बळ मिळाल्याचे कन्हैय्यालाल म्हणाले.

यावेळी सेवादलाचे वाशिम जिल्हाप्रमुख दत्तात्रय बंडेवार, माधवराव अंभोरे, शहरी वृक्ष समूह प्रकल्पाचे प्रमुख जनार्दन बोरकर, संतोष खोडे, सुनील बोरकर, महादेव इंगोले, माणिक राठोड, संजय काळे, दिलीप व्यवहारे, नीलेश मेवाळ, सचिन सोनुने आदींची उपस्थिती होती.