वाशिम : शिक्षणशास्त्र पदवीच्या (बी.एड्.) नियोजित पेपरऐवजी दुसर्याच विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने, वाशिम जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रातील परीक्षार्थींना २0 एप्रिल रोजी मनस्ताप सहन करावा लागला. २0 एप्रिलपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र पदवीची (बी.एड्.) परीक्षा सुरू झाली आहे. २0 एप्रिल रोजी शिक्षणशास्त्र पदवीचा (बी.एड्.) ह्यउदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक व शिक्षणह्ण हा पेपर जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ ते १२ या वेळेत होऊ घातला होता. सकाळी ९ वाजता पेपर असल्याने परीक्षार्थी ८.३0 वाजतापासून संबंधित परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी ९ वाजता प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर नियोजित पेपरऐवजी दुसर्याच विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका वितरित झाल्याचा प्रकार परीक्षार्थींच्या लक्षात आला. ही बाब परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र प्रमुखांच्या निदर्शनात आणून दिली. २३ एप्रिल रोजी होणार्या ह्यशैक्षणिक मानसशास्त्रह्ण या विषयाची प्रश्नपत्रिका २0 एप्रिल रोजी पाहून परीक्षार्थी व परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. परीक्षा केंद्रांकडूनच ही चूक झाल्याचा समज सुरुवातीला परीक्षार्थींचा झाला होता. काही केंद्रांवर केंद्र प्रमुख व परीक्षार्थींमध्ये शाब्दीक वादही झाला. २३ एप्रिलचा पेपर २0 रोजीच सोडवा, असा फतवाही काही परीक्षा केंद्रांनी काढला होता; मात्र परीक्षार्थींनी तीव्र विरोध दर्शविल्याने दुसरा पेपर घेण्यात आला नाही. मानसशास्त्राचा पेपर नियोजित वेळेनुसार तसेच २0 एप्रिलचा पेपर नंतर घेण्यात यावा, अशी मागणी बी.एड्. परीक्षार्थींनी संबंधित केंद्रप्रमुखांमार्फत अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अमरावती विद्यापीठाच्या चुकीमुळे वाशिम, कारंजा व मंगरुळपीर शहरातील एकूण १५ परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी व केंद्र प्रमुखांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मंगरुळपीर येथे परीक्षार्थींनी केंद्र प्रमुखांना निवेदन दिले आहे.
बी.एड्.परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा गोंधळ !
By admin | Updated: April 23, 2015 02:28 IST