शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बॅंका मेहरबान वाशिम : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार असंख्य शेतकरी कर्जमुक्त झाले. त्याचा ...

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बॅंका मेहरबान

वाशिम : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार असंख्य शेतकरी कर्जमुक्त झाले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, २०२१-२१ या आर्थिक वर्षात दरवर्षीच्या तुलनेत दुपटीने ८०० कोटींचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

जिल्ह्यात

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करण्यात आले. जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. कर्ज माफ होण्यासोबतच संबंधित सर्व शेतकरी पुन्हा पीक कर्ज मिळण्यास पात्रदेखील ठरले. प्रशासनाचे प्रयत्न आणि बँकांनी केलेल्या सहकार्यामुळे एरव्ही ४०० कोटींच्या आत राहणारा पीक कर्ज वाटपाचा आकडा यामुळे ८०० कोटींवर पोहोचला.

.........

कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्षात लाभ झाला. यामुळे थकीत असलेले पीक कर्ज माफ होऊन पुन्हा नव्याने कर्ज मिळू शकले. बँकांनीही अपेक्षित सहकार्य केले.

- राजेश कडू

खानापूर, ता. कारंजा

.........

माझ्याकडे असलेले पीक कर्ज महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत माफ झाल्याने मोठा दिलासा मिळाला. अडचणीच्या काळात पुन्हा पीक कर्ज मिळाले.

- प्रदीप इढोळे

मोतसावंगा, ता. मंगरूळपीर

...........

आर्थिक वर्ष २०२०-२१ - उद्दिष्ट (कोटींत) - १६५०, प्रत्यक्ष वाटप - ८१८, शेतकरी संख्या - १०९४३३

आर्थिक वर्ष २०१९-२० - उद्दिष्ट (कोटींत) - १५७०, प्रत्यक्ष वाटप - ४०४, शेतकरी संख्या - ४७८०२

आर्थिक वर्ष २०१८-१९ - उद्दिष्ट (कोटींत) - १५००, प्रत्यक्ष वाटप - ३९३, शेतकरी संख्या - ५५४२२

आर्थिक वर्ष २०१७-१८ - उद्दिष्ट (कोटींत) - १२०४, प्रत्यक्ष वाटप - ३१२, शेतकरी संख्या - ३७२९९

..............

कोट :

जिल्ह्यात दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे मात्र २०२०-२१ या वर्षात एकूण उद्दिष्टाच्या ५० टक्के, ८१८ कोटींचे पीक कर्ज वाटप करता येणे शक्य झाले. शेतकरी कर्जमुक्त होण्यासोबतच त्यांना पुन्हा नव्याने कर्ज मिळू शकले.

- दत्तात्रय निनावकर

अग्रणी बँक व्यवस्थापक, वाशिम