शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये पुन्हा रांगा!

By admin | Updated: November 16, 2016 02:52 IST

एटीएम बंद, पेट्रोल पंपचालकांची मुजोरी कायम.

खामगाव, दि. १५- ५00 व १000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या मंगळवारी जाहीर केला. या निर्णयाला आठ दिवस लोटल्यानंतरही शहरातील आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र असून, सोमवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नागरिकांनी मंगळवारी पुन्हा शहरातील विविध बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी तसेच जमा करण्यासाठी गर्दी केली. काही बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.अत्यावश्यक सेवा आणि काही ठिकाणी २४ नोव्हेंबरपर्यंत ५00, १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे; मात्र बहुतांश ठिकाणी या नोटा अद्यापही स्वीकारल्या जात नाहीत. सराफा बाजारासह किराणा दुकानातही या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने, नागरिक प्रामुख्याने महिला वर्गाची चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र आहे. भाजी बाजारातही हीच परिस्थिती कायम असल्याने, व्यवहार करावे तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या समन्सनंतरही शहर आणि परिसरातील पेट्रोल पंप संचालकांच्या मुजोरीत काहीच फरक पडला नसल्याचे चित्र कायम आहे. नोटा बंदीच्या निर्णयाचा लाभ उठवित पेट्रोल पंप संचालकांनी आपला धंदा वाढविण्याचेच उद्दिष्ट समोर ठेवले. पाचशे आणि हजार रुपयांचे पेट्रोल डिझेल घेतले तरच या नोटा स्वीकारल्या. चिल्लर असल्यानंतरही अनेक ग्राहकांना नाहक पेट्रोल पंपधारकांची वेठीस धरत असल्याचे चित्र आठ दिवसांनंतरही कायमच होते. रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे पैसे स्वीकारण्यात आल; मात्र या ठिकाणी चिल्लरचा खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांचे पैसे स्वीकारल्या जात असतानाही, चिल्लर नसल्याने काहीच उपयोग होत नव्हता. परिणामी, अनेक प्रवासी हतबल झाले आहेत.