मालेगाव (वाशिम) : मेडशी तपासणी नाक्यावर एस.टी. बसच्या तपासणीदरम्यान ५ संशयित बांगलादेशी युवकांना धारदार शस्त्रासह रविवारी ताब्यात घेण्यात आले होते. या पाचही संशयितांना मालेगावच्या न्यायालयात हजर केले असता, पाचही जणांना ९ ऑक्टोबरपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेडशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून नांदेडला जाणारी एम. एच. ४0 वाय ५७२२ क्रमांकाच्या एस.टी. बसची तपासणी केली असता पोलिसांना शस्त्रसाठा असलेली बेवारस बॅग आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी बांग्लादेशातील जशोर जिल्ह्यातील धम्मपोल तालुक्यातील रघुनाथपूर येथील मो. शोगुर मो. यारीफ, मो. सैफुल मो. अनार, मो. अहेदल नुर मोहम्मद, मो. सघान मो.सुलतान, मो. मिंदू फजल आणि मो. फैजली रहमान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बांगलादेशी संशयितांना पोलिस कोठडी
By admin | Updated: October 8, 2014 00:34 IST