शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

नादुरुस्त रोहित्र शेतक-यांच्या मुळावर!

By admin | Updated: August 29, 2016 00:15 IST

कृषी पंपांचे १00; तर गावठाणचे ३0 रोहित्र नादुरुस्त; महावितरणची डोकेदुखी वाढली.

सुनील काकडे वाशिम, दि. २८: गत १५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. अशातच कृषी पंपांचे १00 आणि गावठाणचे ३0 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत अधिकच भर पडली. जलाशय, सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असतानाही विद्युत पुरवठय़ाअभावी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.वाशिम जिल्हा विजेसंदर्भातील समस्यांमध्ये पूर्वीपासूनच 'डेंजर झोन'मध्ये राहिला आहे. ग्रामीण भागात वीज वाहिन्यांवर ह्यआकोडेह्ण टाकून वीज चोरी करणे, विना ह्यकॅपेसिटरह्ण तथा नियमबाहय़ पद्धतीने ह्यऑटो स्विचह्णचा वापर करून एकाचवेळी अनेकांकडून कृषी पंपाद्वारे वीज घेणे, आदी बेकायदेशीर प्रकारांमुळे ग्रामीण भागातील ह्यट्रान्सफार्मरह्ण वारंवार नादुरुस्त होत आहेत. याशिवाय ह्यथ्री फेज ट्रान्सफार्मरह्णमधून कुठलाही एक ह्यफेजह्ण नादुरुस्त झाल्यास लगेच दुसर्‍या ह्यफेजह्णवरून विद्युत पुरवठा घेतला जातो, तो ह्यफेजह्ण बंद पडल्यास तिसर्‍या ह्यफेजह्णचा वापर केला जात असल्याने त्याचा थेट परिणाम कृषी पंपाला पुरविल्या जाणार्‍या विजेसोबतच गावठाण फिडरवरही जाणवत आहे. नादुरुस्त होणारे रोहित्र दुरुस्त होऊन यायला बराच वेळ लागत असल्याने पिकांचे नुकसान होण्यासोबतच गावेच्या गावे विद्युतअभावी अंधारात राहत आहेत. सद्य:स्थितीत वाशिम जिल्हय़ात कृषी पंपांना वीजपुरवठा करणारे सुमारे १00 रोहित्र नादुरुस्त असून गावठाण फिडरवरील ३0 रोहित्र बंद पडले आहेत. परिणामी, जवळपास १0 गावे अंधारात चाचपडत आहेत. यामुळे संबंधित गावांमधील विजेवर चालणारी सर्वच उपकरणे बंद पडली असून आटा चक्की बंद राहत असल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे विदारक वास्तव निर्माण झाले आहे. दरम्यान, नादुरुस्त असलेले जिल्हय़ातील रोहित्र दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामीण भागातील जनतेने संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बन्सोडे यांनी केले. ऑटो स्विचमुळे उद्भवली समस्याग्रामीण भागातील शेतांमध्ये असणारे कृषी पंप सुरू करण्यासाठी बहुतांश शेतकर्‍यांनी ऑटो स्विचची पद्धत अवलंबिली आहे. भारनियमनामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एकाचवेळी अनेकांकडून ह्यऑटो स्विचह्णचा वापर होत असल्याने ह्यट्रान्सफार्मरह्णवर अतिरिक्त भार पडतो आणि रोहित्र जळणे अथवा तांत्रिक कारणांमुळे जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय कृषी पंपांना कॅपेसिटर बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने रोहित्रांवर ३0 टक्के अधिकचा लोड वाढत आहे. रोहित्रांची क्षमता नसताना सकाळच्या सुमारास ग्रामीण भागातील बहुतांश घरांमध्ये सर्रासपणे अधिक लोड खेचणारे ह्यहिटरह्ण सुरू होत असल्यानेही रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार उद्भवतात. याकडे संबंधितांनी विशेष लक्ष पुरवायला हवे.रोहित्र जळणे अथवा नादुरुस्त होण्याचे प्रकार वाशिम जिल्हय़ात वाढीस लागले आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अपेक्षित जनजागृती केली जात असून नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कारवाईदेखील युद्धस्तरावर सुरू आहे.- दत्तात्रेय बनसोडेअधीक्षक अभियंता, महावितरण