वाशिम तालुक्यातील चिखली बु. हे अंदाजे ४५० लोकवस्तीचे गाव असून या गावाकडे जाण्यासाठी नालंदानगर येथून जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता अंदाजे दाेन किलोमीटरचा असून सदर रस्ता सद्यस्थितीत पूर्णपणे खराब झाला आहे. चिखली बु. गावाला जोडणारा हा डांबरी रस्ता अनेक वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर हा रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखली गावातून वाशिमला येण्यासाठी हा एकमेव रस्ता असून गावातील नागरिकांना अति आवश्यक किंवा दवाखान्याच्या कामासाठी वाशिम येथे यायचे असल्यास गावकऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था तसेच या रस्त्यापासून गावकऱ्यांना होणारा त्रास पाहता सदरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करुन गावकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
नालंदानगर ते चिखली रस्ता नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST