शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

सनगाव-शेंदूरजना आढाव रस्त्याची अवस्था वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST

मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा-शेंदूरजना आढाव या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामधील सनगाव ते शेंदूरजना या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे ...

मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा-शेंदूरजना आढाव या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामधील सनगाव ते शेंदूरजना या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन ठिकठिकाणी खडी उघडी पडली, तर मोठमोठे खड्डेही तयार झाले. या रस्त्याने बंजारा बांधवांची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, अकोला येथील शेकडो भाविक विविध वाहनाने प्रवास करतात. शिवाय शेंदूरजना ही मोठी बाजारपेठ असून, येथे मोठे महाविद्यालय व शाळाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह व्यावसायिक आणि इतर लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास या रस्त्याने होत असतो. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था वाईट असतानाही दुरुस्ती करण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी शेंदूरजना आढावनजीक काही अंतरातील रस्त्याचे खडीकरण करण्यात आले; परंतु डांबरीकरण झालेले नसून, या ठिकाणी डांबरीकरण करण्यासह संपूर्ण रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी विष्णू आढाव, पंजाब आडे, गणेश जाधव, प्रमोद आडे, किशोर पवार, राम राठोड, किशोर पोफळे, आदींनी केली आहे.