शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसाहाय्यासाठी ऑटोरिक्षा मालकांचा प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेले १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळण्यासाठी आतापर्यंत १९६ ऑटोरिक्षा मालकांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यापैकी ...

वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेले १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळण्यासाठी आतापर्यंत १९६ ऑटोरिक्षा मालकांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यापैकी १०६ जणांच्या बँक खात्यांवर अर्थसाहाय्य जमा करण्यात आले.

एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी केली होती. कडक निर्बंध कालावधीत परवानाधारक ऑटो मालकांना प्रत्येकी १,५०० रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी परवानाधारक ऑटोरिक्षा मालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. आतापर्यंत १९६ जणांचे अर्ज आले. त्यापैकी १०६ अर्ज मंजूर झाल्याने त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली, तर ९० अर्ज नामंजूर झाले. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास परवानाधारक ऑटोरिक्षा असून, अर्थसाहाय्य योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. अधिकाधिक परवानाधारक ऑटोरिक्षा मालकांना लाभ मिळावा, याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. तरीदेखील अर्थसाहाय्य योजनेसाठी ऑटोरिक्षा मालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

००००००

बॉक्स

स्वतंत्र काउंटरची सुविधा

राज्य शासनाच्या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ अधिकाधिक ऑटोरिक्षा मालकांना व्हावा, याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र काउंटरची सुविधादेखील उपलब्ध केली आहे. ऑनलाइन माहिती भरताना काही अडचणी आल्यास किंवा आधार कार्ड हे मोबाइल क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी या स्वतंत्र काउंटरमध्ये ऑटोरिक्षा मालकांना मार्गदर्शनही करण्यात येते. गत आठ दिवसांपासून या कक्षात कुणीही अर्ज घेऊन आले नसल्याची माहिती आहे.

000000000000000000

कोट बॉक्स

राज्य शासनाने जाहीर केलेल्या १,५०० रुपये अर्थसाहाय्याचा ऑॅटोरिक्षा मालकांना लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची सुविधादेखील उपलब्ध केली. आतापर्यंत १९६ जणांचे ऑनलाइन अर्ज आले असून, त्यापैकी अर्ज मंजूर झालेल्या १०६ जणांच्या बँक खात्यांत अर्थसाहाय्याची रक्कम जमा करण्यात आली.

- ज्ञानेश्वर हिरडे,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

०००००००००००

एकूण नोंदणीकृत ऑटोरिक्षा ३०००

एकूण प्राप्त अर्ज १९६

मंजूर अर्ज १०६

नामंजूर अर्ज ९०