शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून प्रयत्न

By admin | Updated: August 17, 2015 01:35 IST

सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिका-यांचे प्रतिपादन.

वाशिम : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य समारंभात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. सिी, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, आमदार राजेंद्र पाटणी होते. पोलीस निरीक्षक देवीदास इंगळे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती द्विवेदी यांनी दिली. जिल्ह्याच्या सर्वांंगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: जिल्हा टंचाईमुक्त करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील २00 गावांमध्ये हे अभियान राबिवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल, अशा आशावाद द्विवेदी यांनी व्यक्त केला. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांचे सन २0१४-१५ या आर्थिक वर्षातील अल्प मुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरण सुरू आहे. जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील, अशा शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज सन २0१५-१६ या वर्षात माफ होणार आहे. यापुढील ४ वर्षाचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे शेतकर्‍यांच्यावतीने संबंधित बँकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर दारिद्ररेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना सुध्दा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे तांदूळ व गहू वाटप केला जाणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.