कारंजा लाड (जि. वाशिम): पूर्व वैमनस्यातून एका जणावर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवार १३ मे रोजी रात्री साडे अकराच्यासुमारास स्थानिक बायपासवरील अयोध्या वाईनबारमध्ये घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बायपासवरील अयोध्या वाईनबारमध्ये फियार्दी गगन रमेश रॉय (वय २९) रा.नेहरू चैक कारंजा जेवण करीत असताना विक्की काळे याने त्याला गाडीवरून काढून टाकल्याच्या रागातून फियार्दीशी वाद घातला व आरोपी काळे याच्या सोबतच असलेल्या जतीन घारू याने रॉय याच्यावर चाकू चालविण्याचा प्रयत्न केला. यात फियार्दीच्या हाताला जखम झाली. त्यानंतर विक्की काळे याने फियार्दीच्या डोक्यात काचेची बॉटल मारून जखमी केले. या प्रकरणी पोलीसांनी दोन्ही आरोपीविरूद्ध कलम ३२८, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक व्ही.टी.देशमुख करीत आहे.
बारमध्ये तरुणावर हल्ला, एक जखमी
By admin | Updated: May 15, 2015 23:10 IST