शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी संघटना सरसावल्या !

By admin | Updated: April 30, 2017 19:36 IST

वाशिम : १ मे या महाराष्ट्र दिनी झेंडावंदनांतर राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, या दृष्टिकोनातून स्वयंसेवी संघटनांसह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली.

वाशिम : १ मे या महाराष्ट्र दिनी झेंडावंदनांतर राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, या दृष्टिकोनातून स्वयंसेवी संघटनांसह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली. सोमवारीदेखील रस्त्यालगत राष्ट्रध्वज आढळल्यास ते उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहेत.देशात लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वच जण १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिन या दिनात स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात. या दिनी वाहनांवर, घरावर, घराच्या दरवाजावर अनेक जण प्लास्टिक राष्ट्रध्वज किंवा झेंडे लावतात. अनेक विद्यार्थी व युवक दुचाकीवर राष्ट्रध्वज लावून जोरात वाहने चालवितात. हवेमुळे हे राष्ट्रध्वज खाली पडण्याची शक्यता असते. प्लास्टिक राष्ट्रध्वज खाली पडल्यानंतर  त्याच रस्त्यावरून जाणारी  अन्य वाहने ते राष्ट्रध्वज तुडविण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी तरूण क्रांती मंच, राजरत्न स्वयंसेवी संस्था, आयूष बहुद्देशीय स्वयंसेवी संस्था यासह अन्य स्वयंसेवी संस्थांनी गत तीन दिवसांपासून जनजागृती केली. तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील प्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरण्याचे आवाहन केले.घरावर लावलेले किंवा एखाद्या इमारतीवर लावलेले राष्ट्रध्वज सायंकाळी आवर्जून सन्मानाने खाली उतरवावे, असे आवाहनही केले.  वैयक्तिकरित्या घरावर लावलेले राष्ट्रध्वज सायंकाळपर्यंत खाली पडणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याचे आवाहनही करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र याचा अवमान कुणी करीत असल्याची तक्रार दाखल झाली तर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.