शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !

By admin | Updated: July 17, 2017 02:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २५ मे २०१७ रोजीच्या निर्णयानुसार २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे या पदासाठी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या पदासाठी पात्र असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन सादर करून ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, की राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी जारी केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट, सेट, पीएचडी आदि शैक्षणिक अर्हता प्राप्त क रीत आहेत; परंतु त्या प्रमाणात युजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या धोरणामुळे उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. युजीसी किंवा विद्यापीठाने वेळोवेळी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सूचित करुनही संबंधित संस्थाचालक त्यांच्या सुचनांचे पालन न करता रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र शासनही वेळोवेळी प्राध्यापक पदांच्या भरतीसह इतर महत्त्वाच्या पदांच्या भरतीत कपात करून वेळोवेळी पदभरती कमी करीत आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्याकडून हे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आमच्यावर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. प्राध्यापक पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी अल्पभूधारक, भूमीहीन या वर्गातील असून, उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक प्राध्यापकाची भरती तात्काळ सुरू करावी, असे न केल्यास या पदांसाठी पात्र असलेल्या अनेक उमेदवारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, यात शंका नाही.