शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव पोलिसांचे जुगार अड्डय़ावर छापे

By admin | Updated: September 1, 2014 00:41 IST

वाशिम जिल्ह्यातील चार गावांतील जुगार अड्डय़ावर छापे, सात आरोपींना अटक.

वाशिम : गणेश उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आसेगाव पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी चार गावांमध्ये छापे टाकले. यामध्ये पोलिसांनी गावठी दारू विक्रेते व जुगार्‍यांवर कारवाई करून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. मंगरूळपीरचे पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्या मार्गदर्शनात आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ढोके, पोलिस नाईक ज्ञानेश्‍वर राठोड, संजय घाटोळे, संदीप गायकवाड, रवी घरत, सुनील चव्हाण , साहेबराव मुकाडे यांचा समावेश असलेल्या पथकाने मोतसावंगा, देपूळ, काजळंबा व कळंबा बोडखे या पाच गावामध्ये छापे टाकले. यामध्ये मोतसावंगा येथील गंगाराम रामुजी डाखोरे व बबन दत्तू पत्रे या दोघांकडे २५ लीटर गावठी दारू आढळून आली. देपूळ येथील सुरेश कुंडलीक गंगावणे याच्याकडे २0 लीटर देशी दारू आढळली. काजळंबा येथील गजानन गणपत लडबडे याच्याकडे देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्या. कळंबा बोडखे शिवारामध्ये किशोर धर्मा पवार, सुभाष मोतीराम राठोड व मंगल किसन राठोड हे तिघे ५२ ताश पत्ता खेळताना आढळून आले. यामधील चार आरोपीकडून ५३00 रुपयांची देशी व गावठी दारू जप्त केली, तर जुगार खेळणार्‍या आरोपीकडून रोख ३५0 रुपये जप्त केले. यामधील चार आरोपींविरुद्ध कलम ६५ ई अंतर्गत, तर तीन आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या सातही आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध धद्यांवर कारवाई करून अवैध व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.