शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या पॅकेजकडे कलावंतांचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST

मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली. कोरोनाचा ...

मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. गतवर्षी सरकारने शेतकऱ्यांसह विविध लहान-मोठ्या उद्योगांना उभारी देण्यासाठी मध्यंतरी पॅकेज जाहीर करून या घटकांना मदतीचा हात पुढे केला होता. तेव्हाही या पॅकेजमध्ये लोककलावंतांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्यामुळे आणि दुसरीकडे कोणतीही कामे नसल्याने कलावंतांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी वाशिमसह राज्यातील लोककलावंतांनी यापूर्वीही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत कोरोनाचा आलेख खाली आल्याने काही प्रमाणात लोककलावंतांना रोजगार मिळाला. परंतु गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख पुन्हा झेपावत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. त्यामुळे कोणतेही काम नसल्याने आर्थिक पेच निर्माण होत असून, यामधून सावरण्यासाठी शासनाने लोककलावंतांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोककलावंत संघटनेने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली आहे.