शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारावर हल्ला करणा-यांना अटक

By admin | Updated: March 2, 2016 02:42 IST

वाशिम येथील हल्ला प्रकरण; चार जण ताब्यात.

वाशिम: नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांच्यासह पथकावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना वाशिम पोलिसांनी २९ फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. २५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्थानिक हिंगोली नाका परिसरात सदर हल्ला प्रकरण घडले होते. तहसील पथकामार्फत तालुक्यात गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी कारवाया सुरू आहेत. वाशिम तहसीलचे नायब तहसिलदार राहुल वानखेडे व त्यांचे पथक २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हिंगोली नाक्यावर उभ्या असलेल्या रेतीच्या वाहनांची कागदपत्रे तपासणीसाठी गेले होते. यावेळी रेती वाहतूकदारांनी वानखेडे व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांसोबत वाद घालून शिवीगाळ केली. महसूल कर्मचारी या घटनेची चित्रफित काढत असताना त्यांचा मोबाइल अज्ञात इसमाने हिसकावून घेतला. या घटनेदरम्यान रेती वाहतूकदार उमेश मोहळे याने नायब तहसीलदारांची कॉलर पकडून मारहाण केली, तर गोवर्धन हिरवे याने टॉमी काढून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. अशा तक्रारीहून आरोपींविरुद्ध वाशिम शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहभाग असणार्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. तीन-चार दिवसांच्या शोधानंतर या पथकाने सोमवारच्या रात्रीदरम्यान मेहकर, हिंगोली, मालेगाव व कनेरगाव नाका येथून उमेश मोहळे, गोवर्धन हिरवे, दशरथ नेहुल व बाळू गावंडे यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अनिल कांबळे, ठाणेदार रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या पथकाने पार पाडली.