जिल्हास्तरीय समितीची बैठक : कामांना होणार लवकरच प्रारंभवाशिम : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात होणाऱ्या २५ कोटी रुपयांच्या कामांच्या आराखड्यास पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने गुरुवार, १३ एप्रिल रोजी मंजुरी दिली.याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे २५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये भक्त निवासाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, प्रदर्शन केंद्राचे बांधकाम, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, खुल्या सभागृहाचे बांधकाम, जागेचे सपाटीकरण व उद्यान आदी कामांचा समावेश आहे. ही कामे लवकरच सुरू केली जातील, असे यावेळी ठरविण्यात आले.
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना मंजुरी
By admin | Updated: April 14, 2017 01:03 IST