शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांना कामगार कायदा लागू करून कर्जमुक्त करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:23 IST

वाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार संघटनाजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले की, जिल्हयासह महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रात मोडणारे शेतमजुर, हमाल, फेरीवाला, वृत्तपत्र विक्री करणारे, यंत्रमाग, विडी, हॉटेल, भाजीपाला व फळांची विक्री करणारा, रिक्षावाला टांगेवाला, बांधकाम कामगार, घरगुती, धुणेभांडी, मोलमजुरी, छपाई कामगार, पेंटरकाम, चहावाला, दुधवाला, थिएटर कामगार, भाजीपाला विक्रेत्यांबाबत मालकांकडून कामगार कायद्याचे पालन होत नाही. त्यामुळे या सर्व असंघटीत कामगार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे २१ जून २0१७ पासून सोलापूर ते संपूर्ण महाराष्ट्रभर असंघटीत कष्टकरी कामगारांना कर्जमाफी द्या आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार बचाव संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व कामगारांची कर्जमाफी करणे, शेतमजूरांना कामगार कायदे लागु करणे, कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करणे, कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतन लागु करणे, त्यांना भविष्यनिर्वाह निधी देणे, विमा कायदा लागु करणे, अपघाती विमा लागु करणे, कामगारांसाठी शैक्षणिक, आर्थिक व आरोग्यविषयक योजना राबविणे, त्यांना मोफत बस प्रवास पास देणे व कामगारांना विनाव्याज बँकेकडून कर्ज देणे आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, बाजार समिती उपसभापती सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष गजाननराव देशमुख, बंडु शिंदे, विठ्ठल चौधरी आदिंची उपस्थिती होती.