शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कृषीविषयक योजनांच्या अर्ज प्रक्रियेस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:12 IST

वाशिम: राष्ट्रीय कडधान्य, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजना सन २0१७-१८ या वर्षांत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून १४ ऑगस्ट ही अंतीम मुदत असल्याने शेतकर्‍यांनी त्यापूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी करण्यात आले.

ठळक मुद्दे१४ ऑगस्ट अंतीम मुदतअनुदानावर शेतीपयोगी वस्तूंचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय कडधान्य, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजना सन २0१७-१८ या वर्षांत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून १४ ऑगस्ट ही अंतीम मुदत असल्याने शेतकर्‍यांनी त्यापूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी करण्यात आले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत सिंचन साधने व सुविधा या बाबींसाठी चालू वर्षात लाभ द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासकीय अनुदानावर तुषार संच, इलेक्ट्रीक पंप संच, एच.डी.पी.ई. पाईपचा लाभ दिला जाणार आहे. तुषार संच रुपये १0 हजार रुपये प्रति लाभार्थी, इलेक्ट्रीक पंपसंच रुपये १0 हजार प्रति नग व एच.डी.पी.ई.पाईप रुपये ५0 प्रतिमिटर (कमाल र्मयादा रुपये १५ हजार) याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित रक्कम शेतकर्‍यांनी खर्च करावयाची आहे. राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजनेंतर्गत पी.व्ही.सी. पाईपसाठी शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येणार आहे. पी.व्ही.सी. पाईपसाठी रुपये २५ प्रति मीटरप्रमाणे शेतकर्‍यांना कृषि खात्यामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. सदर दोन्ही योजनेंतर्गत विविध बाबींचा लाभ घेवू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना सदरचा लाभ मिळणेबाबतचा अर्ज शेतकर्‍यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे दिनांक १४ ऑगस्टपयर्ंत करावा. तालुक्यास प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शेतकर्‍यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. विविध बाबीकरीता निवड झालेल्या शेतकर्‍यांना तालुका कृषि अधिकारी यांचेकडून पुर्व संमती देण्यात येणार आहे. पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍यांनी खुल्या बाजारातुन तुषार संच, इलेक्ट्रीक पंपसंच, एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी. पाईपाची खरेदी करावयाची आहे. तसेच अनुदानाची मागणी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे करावयाची आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संर्पक साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.