शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:08 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहनअंतिम मुदत नऊ दिवसांवर४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी कळविले. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर आपले उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी असल्यास आपले सरकार सेवा केंद्राचे संजय यादव (भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७३३७५४६७), ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक : ७५८८६७८४७४), महा ई-सेवा केंद्राचे सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५0३७१६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३0 शेतकर्‍यांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी त्वरित नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपला अर्ज परिपूर्ण भरला गेल्याची खात्री करून घ्यावी, तसेच अर्ज भरल्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. -