शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी मुंग व उडिद शेतमालाची नोंद नाफेड संस्थेकडे करण्याचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:10 IST

वाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल्यापद्धतीने व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी नाफेड, खरेदी करणाऱ्या सब एजंट संस्था,कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंग व उडीद शेतमालाची नोंदणी करण्याच्या सुचना या कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन शेतकºयांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देकेंद्राकडे खरेदीचा प्रस्तावसंबंधित संस्था, बाजार समित्यांची कार्यशाळा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल्यापद्धतीने व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी नाफेड, खरेदी करणाऱ्या सब एजंट संस्था,कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंग व उडीद शेतमालाची नोंदणी करण्याच्या सुचना या कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन शेतकºयांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. शासनाकडून नाफेड खरेदीस मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी शेतकºयांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या-ज्या खरेदी केंद्राअंतर्गत शेतकरी वर्गांची गावे समाविष्ठ आहेत त्या-त्या केंद्रावर शेतकºयांनी जमीनीचे क्षेत्र,पीक पेºयाची नोंद असलेला ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, बँक खाते क्रमांकाची सविस्तर माहिती,पत्ता व भ्रमणध्वनी आदि कागदपत्रे सादर करुन आपलेकडील मुंग व उडीद शेतमालाची नोंद संबंधीत नाफेड खरेदी करणाºया नाफेडच्या संबंधित संस्थेकडे करावी. यानंतर शेतकºयांना क्रमवारीनुसार शेतमाल घेऊन येण्यास संबंधित संस्थेमार्फत कळविण्यात येणार आहे. दररोज १००० क्विंटल शेतमालाची मोजणी करुन घेण्याची व्यवस्था सदरचे खरेदी केंद्रावर करण्यात येणार आहे, मात्र आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी चांगल्याप्रकारे सुकवुन व चाळणी करुन  एफएक्यू दर्जाचा शेतमाल आणल्यास त्याचा फायदा शेतकरी वर्गांना निश्चितच होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.