शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अँट्रॉसिटी रद्द नव्हे, बदल करण्याची मागणी!

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

वाशिम येथे सकल मराठा समाजातील युवतींची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम, दि. २३- 'मराठा क्रांती मोर्चा'हा कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात नसून, अत्याचार व नराधम प्रवृत्तीच्या विरोधात आहे. काही जण मोर्चाबाबत गैरसमज पसरवित आहेत, त्या अफवांना बळी पडू नका, तसेच मोर्चा हा अँट्रॉसिटी रद्द करण्यासाठी नसून, त्याचा होत असलेला गैरवापर टाळण्याकरिता त्यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी असल्याची माहिती सकल मराठा समाजातील युवतींनी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक तुर्के कॉम्प्लेक्सस्थित सकल मराठा मूक मोर्चा कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजातील युवतींनी मोर्चासंदर्भात पसरविल्या जाणार्‍या गैरसमजाबाबत व नियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांबाबत सांगितले, की कोपर्डी येथील मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि अमानवीय पद्धतीने झालेल्या हत्येच्या निषेधार्थ समाजमनाच्या तीव्र भावना शांततेने आणि संयमाने व्यक्त करण्यासाठी आहे. यापुढे कोणीही असे कृत्य करू नये, त्याला धडकी भरावी, यासाठी हा मोर्चा आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या आहेत. या मोर्चाच्या दिवशी कोणत्याच प्रकारचे शहर बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा आयोजकांनी केलेले नाही. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जे मोर्चात सहभागी होतील त्यांचे स्वागतच आहे. मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यामध्ये सहभागी होऊन अपप्रवृत्तीबद्दल रोष दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील महिला, युवती व पुरुषांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. मोर्चा नियोजनाबाबत..सकल मराठा समाजाचा मोर्चा हा पूर्णपणे शांततेने, आपसातही न बोलता काढायचा आहे. मोर्चात सर्वात आधी महिला, तरुणी, विद्यार्थिनी असतील. त्यांच्यामागे सर्व पुरुष अशी रचना आहे. मोर्चा हा संपूर्ण समाजाचा असल्याने कोणीही नेता किंवा प्रमुख नाही. मोर्चामध्ये एकजूट दाखविण्यासाठी सर्व बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह व नातेवाइकांसह उपस्थित रहावे. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान कोणालाही अडथळा होऊ नये, याकरिता मोर्चादरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चासाठी २0 हजार फलक, २0 हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २0 रुग्णवाहिका, १0 महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २0 लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनिक्षेपक, १0 स्क्रिन असून, मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.