शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंग, वाशिमच्या केंद्रावरील तूर मोजणी वांध्यात!

By admin | Updated: May 1, 2017 02:10 IST

दोन्ही ठिकाणी मिळून १० हजार क्विंटल: शेतकऱ्यांच्या यादीत चुका

मंगरुळपीर - नाफेडची खरेदी २२ एप्रिलपासून नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीच्या ओट्यांवरील शिल्लक तुरीचे पंचनामे तीन दिवसांपूर्वी करण्यात आले; परंतु मंगरुळपीर वगळता इतर ठिकाणची मोजणी अद्यापही सुरू झाली नाही. त्यातच बाजार समितीच्या ओट्यावर असलेली तूर आणि प्रत्यक्षात बाजार समितीने सादर केलेली शेतकऱ्यांची यादी यात मेळ नसल्याने येथील तूर मोजणी वांध्यातच आली आहे. जिल्ह्यात नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील सहाही शासकीय खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर पडून आहे. यात वाशिम आणि अनसिंग येथील बाजार समितीचाही समावेश आहे. नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर केव्हा सुरू होणार, याबाबतची स्थिती अद्याप अधांतरीच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहाही नाफेड केंद्रावर पडून असलेल्या ४१ हजार क्विंटल तूरीच्या शासकीय पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे तुरीची मोजणी सुरु होणे अपेक्षीत होते. त्यासाठी वाशिम बाजार समितीने शेतकऱ्यांची यादी तयारकेली; परंतु ही बाजार समितीकडील यादी आणि बाजाराच्या ओट्यावर असलेल्या तूर उत्पादकांच्या नावात तफावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी तूर मोजावी कशी हा प्रश्न उपस्थित झाला. त्यातच पूर्वी नाफेडच्या केंद्रावर साडे तीन हजार क्विंटल तूर शिल्लक असताना पंचनाम्यानंतर ती सहा हजार क्विंटल असल्याचे दिसले. त्यामुळे तुरीच्या प्रमाणासह शेतकऱ्यांच्या नावात फरक निर्माण झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता रविवार आणि सोमवारही सुटी असल्याने नाफेडच्या केंद्रावरील तुरीची मोजणी मंगळवारपर्यंत होऊ शकणार नसल्याचे नाफेडच्या मोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.