जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. शनिवारी जिल्ह्याबाहेर नव्याने एक रुग्ण आढळून आला, तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली. शनिवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
-------------------------------१५ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने १ रुग्ण आढळून आला, तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात असे एकूण १५ रुग्ण आहेत.