नव्या रुग्णांमध्ये वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, शुक्रवार पेठ येथील १, संतोषी माता नगर येथील १, माऊंट कार्मेल शाळा परिसरातील १, पंचाळा १, कळंबा महाली येथील १, रिसोड शहरातील सिव्हील लाईन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, नेतन्सा येथील १, गोहगाव येथील १, मालेगाव शहरातील १, पिंपळशेंडा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथील १, मानोरा शहरातील ४, म्हसणी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता ७ हजार २०९ वर पोहोचला आहे. कोरोनामुळे १५५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे; तर १३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आणखी २० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:18 IST