फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी (दि. ४) एकूण १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील देवपेठ येथील १, लाखाळा येथील १, रिसोड शहरातील बालाजी गल्ली येथील १, इतर ठिकाणचे २, कारंजा शहरातील लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, नूतन कॉलनी येथील ३, भीमनगर येथील ३, गुरुदेवनगर येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,१८९ वर पोहोचला आहे. गुरुवारी नऊ जणांना रुग्णालयातून सुट्टी झाली. आतापर्यंत कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००
१३७ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,१८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,८९६ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.