शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘वार्षिक सवलत कार्ड’ बंद करणे अयोग्य!

By admin | Updated: May 1, 2017 02:09 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाच!

वाशिम : एसटी महामंडळ तोट्यात असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. या योजनेत प्रवाशांना प्रवासात १० टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार असून, या योजनेचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांचेही नुकसान होणार आहे. याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी लोकमतच्या स्थानिक कार्यालयात रविवारी परिचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये काही जणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे तर काही जणांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. या परिचर्चेत आशिष जैन, अनिल चव्हाण, एम. व्ही. डवरे आणि मनोज भोयर या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. २प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २००३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे हजारो प्रवासी या योजनेचा फायदा घेऊन एसटीनेच प्रवास करीत होते. त्यामुळे एसटीला फायदाच होता. आता ही योजना बंद झाल्यामुळे एसटीकडील प्रवाशांची संख्या कमी होईल. - एम. व्ही. डवरे, आश्रम शाळा संघ प्रदेशाध्यक्षवार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत २०० रुपये मुल्य आकारण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला १० टक्के सवलत देण्यात येत होती. या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. त्यामुळे ही योजना बंद करणे चुकच आहे. - मनोज भोयरवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांनाही फायदाच होता. ही बाब खरी आहे; परंतु ही योजना बंद केल्याने एसटीचे नुकसान होईल, असे म्हणता येणार नाही. कारण एसटी इतर योजनांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवू शकते, असे आपल्याला वाटते.-अनिल चव्हाणवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होतेप्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटीला फायदाच होता. हजारो प्रवासी एसटीचा आधार घेत होते. ही योजना बंद केल्याने एसटीचेच नुकसान आहे. - आशिष जैन, कारंजा लाड