पोहा : पोहा येथून चार किलोमिटर अंतरावर असलेले किसाननगर येथील अंगणवाडीचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडल्यामुळे गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. किसाननगर हे छोटेस गाव असून येथे जास्तीत जास्त पारधी व बंजारा समाज असून काही बौद्ध बांधवांची घरे आहे. एकंदरीत हे सर्व लोक गरीब व दारिद्रय रेषेखालील आहेत. येथे गेल्या दोन ते तीन वर्षाआधी अंगणवाडी केंद्राला मंजुरात मिळून बांधकामाला सुरूवात झाली. परंतु हे बांधकाम तीन वर्षे उलटूनही अपुर्ण आहे. या अंगणवाडी केंद्रात चिमुकल्यांना शौचालय नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नार्ही. विजेची फिटिंग केलेली नाही. शौचालयाचे खड्डे खोदून अर्धवट आहेत. बांधकाम झालेल्या भिंतीना अंगणवाडी केंद्र सुरू होण्याआधीच तडे गेले आहे.यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. मागील तीन वर्षापासून गावातील अंगणवाडी केंद्रामधील चिमुकली मुले ग्रामपंचायतच्या आवारात बसतात. या आवारातही पावसाच पाणी गळते. त्यामुळे चिमुकल्याचे हाल होतात. या संबंधी गावकर्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ कर्मचार्यांना वेळेोवेळी सांगुनही काहीही फायदा झाला नाही.संबंधित बांधकाम ठेकेदारालाही याबाबत विचारले असता आपले बिल निघाले नसल्यामुळे आपण हे काम पूर्ण करू शकत नाही असे गावकर्यांना सांगितले.अधिकार्यांना विचारले तर ते बांधकाम ठेकेदाराकडे बोट दाखवतात. गेल्या दोन ते तीन वर्षापासून सदर अंगणवाडी केन्द्राचे बांधकाम अपुर्ण असल्यामुळे ते शोभेची वस्तू बनले आहे. याचा फटका चिमुकल्या विद्यार्थ्यांंना सोसावा लागत आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन अंगणवाडीचे बांधकाम लवकर पुर्ण करावे अशी मागणी गावकर्यांनी गटविकास अधिकारी कारंजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अंगणवाडीचे काम तीन वर्षापासून रखडले
By admin | Updated: June 28, 2014 23:41 IST