शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील दुग्धजन्य पदार्थांना आंध्र प्रदेशात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:50 IST

शिरपूर : मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असंभव कामाला स्वरूप देऊन ते संभव करू शकतो. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करून दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्र प्रदेशातून चांगलीच मागणी आहे.

ठळक मुद्देयोगेशची जिद्द व चिकाटी पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असंभव कामाला स्वरूप देऊन ते संभव करू शकतो. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करून दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्र प्रदेशातून चांगलीच मागणी आहे. दिवसाकाठी मालेगाव या छोट्याशा गावात ७0 ते ७५ हजार रुपये प्रतिदिन दुग्धजन्य पदार्थाची विक्री करण्याची किमया योगेश रामचंद्र बळी यांनी करून दाखविली आहे. विशेष म्हणजे, या पारंपरिक व्यवसायाला चालविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरीसुद्धा सोडून दिली, हे विशेष!वाशिम जिल्हय़ातील सर्वात छोटा तालुका म्हणून मालेगाव तालुक्याची ओळख आहे. या छोट्याशा गावात योगेशने केलेल्या या किमयेचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेशचे वडिलांची दूध डेअरी होती. कोणतीही मिलावट न करता दुधाची विक्री करणारे म्हणून ते शहरात प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या डेअरीचे नावसुद्धा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होते. खेड्यापाड्यातील नागरिकसुद्धा दूध, तुपाची चणचण भासली, की बळींच्या डेअरीवरून घेऊन या, असे म्हणायचे. त्यांचा मुलगा शिकून मेहकर येथे शिक्षक म्हणून कार्य करू लागला. सात वर्षांपर्यंत शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला पुढे नेण्याच्या दुष्टीने त्याने विचार केला. त्याने दुधासोबत आधी थोड्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ बनवून ते गावातच विकणे सुरू केले. दिवसेंदिवस मागणीत वाढ झाली. यांनी तयार केलेला माल नागपूर येथील एका व्यावसायिकाने नेला व तेव्हापासून नागपूरलासुद्धा यांचा माल जायला लागला. आजच्या घडीला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत आंध्र प्रदेशातील हैदराबादसह इतर गावात यांच्या दुग्धजन्य पदार्थ्यांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. दिवसभर कढईमध्ये दूध घोटण्यासहच विविध दुग्धजन्य पदार्थांचे काम येथे अविरत सुरू राहते. विशेष म्हणजे, आधी छोट्याशा असलेल्या येथील बळी यांच्या डेअरीमध्ये जवळपास १५ मनुष्य काम करतात. येथे तयार करण्यात येत असलेला पेढा सर्वदूर परिचित       आहे. 

मालेगाव येथे १९८६ पासून रामचंद्र बळी दुधाचा व्यवसाय करायचे. २000 पर्यंत त्यांनी व्यवसाय चालविला. परंतु मेहकर येथे शिक्षक असलेल्या योगेश नामक मुलाने या व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरुप देत दुग्धजन्य पदार्थ बनविणे सुरु केले. ज्याप्रमाणे वडिलांचे नाव दुधडेअरी व्यवसायात होते तोच विश्‍वास त्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रीतही मिळविल्याने आजच्या घडीला त्यांच्या व्यवसायास भरभराटी आली आहे.

वडिलांनी सुरू केलेली दूध डेअरी व तेथे असलेली गर्दी पाहता मी त्यांना मदत करायचो; परंतु नोकरी लागल्याने माझे याकडे दुर्लक्ष झाले. काही वर्षे नोकरी केल्यानंतर विचार आला, की वडिलांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी म्हणून मी दुधापासूनच विविध पदार्थ बनविणे सुरू केले. आधी पारंपरिक पद्धतीने बनवित असलेले दुग्धजन्य पदार्थ गुगलवर सर्च करून आधुनिक मशिनरीजची माहिती जाणून घेतली. आज एक एक करता कामापुरत्या मशीन उपलब्ध करणे सुरू आहे. २000 सालापासून मी हातात घेतलेल्या व्यवसायाने आज प्रसिद्धीसह चांगल्या उत्पादनाचा शिक्कामोर्तब झाला आहे. माझ्याकडील पेढा संपूर्ण विदर्भासह आंध्र प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे.-योगेश रामचंद्र बळी, मालेगाव.

टॅग्स :washimवाशिमfoodअन्न