शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अन् वाशिम जिल्हा सुन्न झाला !

By admin | Updated: June 4, 2014 01:22 IST

कार अपघाताच्या घटनेनंतर निधन धडकले अख्खा वाशिम जिल्हा सुन्न झाला

वाशिम: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी ६.३0 वाजता कार अपघाताच्या घटनेनंतर निधन झाल्याचे वृत्त टिव्ही व विविध न्यूज चॅनेल्सवर झळकले अन् पहाटेवर दु:खाचे सावट पसरून अख्खा वाशिम जिल्हा सुन्न झाला. वाशिम जिल्हयात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांप्रमाणेच अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी मुंडे यांचा संपर्क होता. जिल्हयात त्यांचे नेटवर्क मोठे होते. जिल्हयात भाजपाप्रमाणेच अन्य पक्षातही त्यांचे चाहते मोठया प्रमाणात आहेत. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाउ लागली. शिरपूरजैन येथे हे वृत्त कळताच व्यापार्‍यांनी नुकतीच उघडलेली दुकाने तात्काळ बंद करुन बाजारपेठ बंद ठेवली संपूर्ण बाजारपेठ सायंकाळपर्यंत बंद ठेवून व्यापार्‍यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे सुद्धा व्यापार्‍यांनी दुकाने सायंकाळपर्यंत बंद ठेवली. वाशिम,कारंजा, मंगरुळपीर, रिसोड मालेगाव, मानोरा, या मोठया शहरासह जिल्हयातील लहानमोठया गावांमध्ये मुंडेच्या निधनाचे वृत्त सकाळी समजताच चौकाचौकात लोक एकत्र जमन या एकच विषयावर चर्चा करताना आढळून येत होते. लोक दिवसभर हॉटेल व पानटटयावर असलेल्या टीव्हीसमोर जमून या घटनेबाबत स्पेशल रिपोर्ट ऐकताना दिसून येत होते.