शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

अनसिंग येथील पशुदवाखाना समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: May 17, 2014 23:13 IST

अनसिंग येथील पशुदवाखान्यात असुविधा; जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी.

अनसिंग: येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा वनवास संपता संपेना, अशीच परिस्थिती आहे. भरघोस निधी मंजूर असूनही सुविधा कागदोपत्रीच शोभून दिसत आहे. पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकरी, पशुपालन व्यवसाय करणार्‍यांवर कुर्‍हाड कोसळली आहे. या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची भव्य इमारत व फार मोठी जागा उपलब्ध आहे.परंतु, तेथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या या दवाखान्याकडे कुठल्याही अधिकार्‍यांचे लक्ष नाही. या ठिकाणी लसीकरणाबाबत शेतकर्‍यांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही. या ठिकाणी लॅबची व्यवस्था नाही. गुरांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध नाहीत. याकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. अनसिंग परिसरातील हजारो पशुपालकांकडे गाय, बैल, म्हैस, बकरी आदी जनावरे आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे काही शेतकरी वळत आहेत. त्यामुळे साहजिकच पशुसंवर्धन विभागानेदेखील मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, अनसिंग येथील पशु वैद्यकीय दवाखानाच विविध समस्यांच्या विळख्यात अडकल्याने पशुपालक वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. खासगी दवाखान्यात महागडे उपचार करावे लागत आहेत. याकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील पशुपालकांनी केली आहे.