शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप सुरू

By admin | Updated: January 22, 2015 00:12 IST

मंगरूळपीर तालुक्यातील १६ हजार ९९६ शेतक-यांना लाभ; पहिल्या टप्यात ९९ गावांचा समावेश.

साहेबराव राठोड/ मंगरूळपीर (जि. वाशिम):खरीप हंगामात अपुर्‍या पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील १३८ गावातील ३८ हजार ४0४ शेतकर्‍यांपैकी ९९ गावातील १६ हजार ९९६ शेतकर्‍यांना पहिल्या टप्यात प्राप्त झालेल्या ८ कोटी ५0 लाख निधीचे वितरण सुरू झाले असून दोन दिवसात जवळपास दोन कोटी रूपये लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली आहे. ९९ गावातील बॅक खाते प्राप्त झालेल्या १६ हजार ९९६ शेतकर्‍यांचा समावेश पहिल्या यादीत करण्यात आला असून शेतकर्‍यांच्या १८ हजार ५६६ हेक्टर १४ आर ऐवढय़ा नुकसान क्षेत्रानां पहिल्या टप्याचा लाभ दिल्या जाणार आहे. खरिप हंगामात अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हा हंगाम तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी नुकसानकारक ठरले होते. नापिकीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रोजगार मिळेनासे झाला आहे. नापिकीचे परिणाम बाजारपेठेवर सुध्दा आढळून येत आहे. अपुर्‍या प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका बसल्यानंतर शासनाने मंगरूळपीर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून मदत देण्याचे जाहीर केले होते.अपेक्षित २0 कोटी रक्कमेपैकी ८ कोटी ५0 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून ज्या शेतकर्‍यांनी बँॅक खाते क्रमांक तलाठय़ाकडे सादर केला, त्या शेतकर्‍यांना पहिल्या टप्यातील प्राप्त निधीचा लाभ देणे सुरू झाले आहे. तहसीलदार बळवंत अरखराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्याला प्राप्त झालेल्या ८ कोटी ५३ लाख निधीचे नियोजन करून ज्या शेतकर्‍यांची बँक खाती महसूल विभागाकडे प्राप्त झाली असल्याचे सांगीतले. दुष्काळग्रस्त मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व तलाठय़ांना शेतकर्‍याकडील बँक खाते घेवून सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.