शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

वाशिम नगरपालिकेच्या सर्वच शाळा ‘डिजिटल’

By admin | Updated: April 7, 2017 15:06 IST

सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे.

जिल्हयातील पहिली नगरपालिका :शिक्षण विभागाचे कार्य उल्लेखनिय!वाशिम - नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणक ज्ञानासोबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शाळा डिटिटल करण्यात आल्या आहेत. सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबाबत शासनांचा उपक्रम होता. ३१ मार्च २०१७ पर्यंत शाळा डिजिटल करण्याबाबत शासनाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लोकवर्गणी , लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याबाबतची मोठी चळवळ सुरु झाली व जिल्हायत सर्वप्रथम सर्व शाळा वाशिम नगरपलिकेने डिजिटल केल्यात. डिजिटल शाळांमुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन सुलभ झाले. विद्यार्थी पालकांचा कल नगरपरिषद शाळांकडे वाढला व स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्याां आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविल्या जात आहे. शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाशिम नगरपरिषदेच्या एकूण १७ शाळा असून या शाळांमध्ये ३२ इंच अ‍ॅड्रॉईड टि.व्ही व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे सॉफटवेअर बसविण्यात आले आहे. या सोबतच काही शाळांमध्ये संगणक संच सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत वाशिम नगरपरिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असून याबाबतीत वाशिम नगरपालिका जिल्हयामध्ये पहिली ठरली आहे. सदर शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शासनाचे कोणतेही अनुदान नसतांना काही अंशी लोकवर्गणी व स्वत:च्या खर्चामुळे डिजिटल केल्याने मुख्याधिकारी गणेश शेटे, प्रशासन अधिकारी आकाश आहाळे यांनी सर्वांचे कौतूक केले.नगरपरिषद वाशिम शाळांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन नेहमीच पुढाकार घेतोय. शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी नियमित आढावा घेण्यात आला. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याची विशेष काळजी घेवून येत्या सत्रात विकासासाठी अधिक लक्ष दिल्या जाईल-गणेश शेटेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिमन.प.शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून यासाठी सर्व मुख्याध्यापक व शिक्षक पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. डिजिटल शाळा झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली आहे. न.प. शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. आता प्रत्येक खोली डिजिटल करण्याचा प्रयत्न चालु आहे.-आकाश अहाळेप्रशासन अधिकारी, नगरपरिषद वाशिम