शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बेलखेडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अपात्र!

By admin | Updated: July 2, 2017 19:40 IST

वाशिम : अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी बेलखेडा (ता.रिसोड) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह इतर पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेले अतिक्रमण काढण्याऐवजी मर्जीतील अतिक्रमणधारकांना संरक्षण देवून पदाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी गावातीलच हरिभाऊ दत्तात्रय चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी निर्णय देत बेलखेडा (ता.रिसोड) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह इतर पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते, की बेलखेडा येथील भुखंड क्रमांक ११ हा ग्रामपंचायतीने पंढरी देव्हढे आणि उत्तम देव्हढे यांना २५ वर्षांपूर्वी विकला; परंतू याबाबत ग्रामपंचायतीकडे कुठलेच रेकॉर्ड नाही. असे असताना हे अतिक्रमण हटविले नाही. ऊलट अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य करून कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन केले. पद आणि अधिकाराचा दुरूपयोग केल्याने सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३८ प्रमाणे शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हे निष्कर्ष लक्षात घेवून विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी सरपंच भागिरथीबाई चव्हाण, उपसरपंच इंदूबाई चव्हाण, सदस्य गोविंदा ताजने, हेमंत घोडे, माधव बनसोड, लक्ष्मीबाई गायकवाड, रुख्मीनाबाई देव्हढे यांना सदस्यत्व अपात्र घोषित केले.