शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथील सर्व समावेशक आघाडी फुटीच्या उंबरठय़ावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:10 IST

मानोरा : माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना शह देण्यासाठी  स्थानिक नेत्यांनी सर्वांना एकत्र करुन सर्व समावेशक  आघाडी तयार करुन खरेदी विक्री संघ व बाजार समितीची  सत्ता हस्तगत केली.

ठळक मुद्दे बाजार समिती सभापतीच्या राजीनाम्याकडे लक्ष सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना शह देण्यासाठी  स्थानिक नेत्यांनी सर्वांना एकत्र करुन सर्व समावेशक  आघाडी तयार करुन खरेदी विक्री संघ व बाजार समितीची  सत्ता हस्तगत केली. तदनंतर सहकार नेते सुरेश गावंडे  यांच्या रामतीर्थ येथील निवासस्थानी मातब्बर नेते व  संचालकांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सभापती म्हणून  डॉ. संजय रोठे यांना दोन वर्षांसाठी सर्वानुमते विराजमान  केले; परंतु ज्या नेत्यांच्या विरोधात सर्वसमावेशक सत्ता  आणली त्याच नेत्याच्या गळाला आघाडीचे दोन नेते  लागल्याने कार्यकाळ संपत आलेले सभापती पदाचा  राजीनामा देतील काय, असा प्रश्न पडला     आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या बाजार समिती व खरेदी विक्री संघ  ताब्यात घेण्यासाठी माजी राज्यमंत्री  सुभाष ठाकरे यांच्या  विरोधात स्थानिक नेते माजी वीज मंडळ सदस्य अनिल  राठोड, माजी जि.प.अध्यक्ष अरविंद इंगोले, सहकार नेते  सुरेश गावंडे यांनी सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवून  जनतेचा विश्‍वास संपादन केला आणि बहुमतांनी दोन्ही संस् था हस्तगत केल्या. तेव्हा सभापतीची माळ कुण्याच्या  गळ्यात टाकायची, यासाठी रामतीर्थ येथे बैठक बोलावून या  सर्व नेत्यांच्या समोर दोन वर्षांसाठी डॉ. संजय रोठे यांना  सभापती करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हा कार्यकाळ येत्या  २४ सप्टेंबरला संपत आहे. नवीन सभापती होण्यासाठी पावले उचलणे आवश्यक अस ताना आघाडीच्या दोन नेत्यांनी बुधवारी स्थानिक विश्राम  गृहावर बाजार समितीच्या संचालकांना मेजवानी दिली व  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला सहा-सात संचालक उपस्थित होते. दोन ने त्यांनी वेगळी बैठक बोलावल्याने विद्यमान सभापती   राजीनामा देतील काय, याबद्दल  संचालक आघाडी  फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचे दिसत आहे. मानोरा पंचाय त समिती माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील यांनी माजी  राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिल्याने तेव्हाच  सर्वसमावेशक आघाडीमध्ये उभी फुट पडली होती, असे  बोलल्या जात आहे. 

तालुक्यातील घडामोडी काही असल्या, तरी बाजार समि तीच्या भविष्यासाठी आम्ही तिघेही एकच आहोत. सभाप तींनी  ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी पुन्हा  चांगला, कर्तव्यतत्पर सभापती व्हावा, अशी माझी इच्छा  आहे.- सुरेश गावंडे, सहकार नेते, मानोरा

बाजार समितीची सभापतीची जबाबदारी दोन वर्षांसाठी हो ती, हे खर आहे; पण सर्व समावेशक आघाडीचे तिन्ही नेते  जे सांगतील तो निर्णय मान्य राहील. २४ सप्टेंबरला दोन वर्ष  पूर्ण होत आहेत. - डॉ.संजय रोठे, सभापती,  बाजार समिती मानोरा