शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ५९ गावे ‘ब्लिचिंग पावडर’विना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:10 IST

अकोला: जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले असताना, जिल्ह्यातील पाच तालुक्यातल्या ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणी पाणी पुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर होत नसल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले आहे.

ठळक मुद्देजलसुरक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गत जून महिन्यात जिल्ह्यातील गावागावांत सर्वेक्षण करण्यात आले. पाच तालुक्यातील ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ उपलब्ध नसल्याचे वास्तव आढळून आले आहे.ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले असताना, जिल्ह्यातील पाच तालुक्यातल्या ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणी पाणी पुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर होत नसल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले आहे. ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींची उदासीनता समोर येत असून, दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जलसुरक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गत जून महिन्यात जिल्ह्यातील गावागावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाणी आणि ब्लिचिंग पावडरचे नमुने घेण्यात आले असून, या सर्वेक्षणाचा अहवाल गत १२ जुलै रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यातील ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणीपुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ उपलब्ध नसल्याचे वास्तव आढळून आले आहे. पावसाळा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर सध्या जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले आहे. त्यामध्ये ताप, खोकला, सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी व इतर प्रकारच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ उपलब्ध नसल्याने, यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींच्या उदासीन कारभारात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जिल्ह्यात ५९ गावे ब्लिचिंग पावडरविनाआरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गत जून महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९४६ पाणी नमुने घेण्यात आले. नमुने तपासणीच्या प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १४३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यात ४५, बार्शीटाकळी तालुक्यात १५, अकोट तालुक्यात ७, तेल्हारा तालुक्यात ९, बाळापूर तालुक्यात ४०, पातूर तालुक्यात १३ आणि मूर्तिजापूर तालुक्यात १४ पाणी नमुने दूषित आढळून आले. ग्रामपंचायतींना निर्देशस्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या गावांत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही, अशा ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा करताना नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर करून, निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फत १२ जुलै रोजी संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत