शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ‘अकोला’वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:24 IST

वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांना आता योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोल येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर जावे लागणार नाही.

ठळक मुद्देब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अपूर्ण मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परिवहन वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवर ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर घेणे आवश्यक आहे. वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांना आता योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोल येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर जावे लागणार नाही.वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतंत्र इमारत व ट्रॅक नाही. नवीन इमारत व ट्रॅकचे काम सुरू असून, अद्याप ट्रॅकचे काम पूर्ण झाले नाही. शासनाच्या परिपत्रकान्वये आता परिवहन वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवर ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर घेणे आवश्यक आहे. वाशिम येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून वाशिम जिल्ह्यातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणासाठी अकोला येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जावे लागणार आहे. तत्पूर्वी वाहनधारकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे विहित शुल्काचा भरणा करुन व शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यानंतर वाहने अकोला येथे घेऊन जावी लागणार आहेत. अकोला येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण करण्याकरीता वाशिम कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण करण्याकरीता वाहने अकोला येथे न्यावी, असे  आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले. वाशिम येथील सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वाशिम येथेच योयता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण केले जाणार आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.