शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

आकोडा टाकुन विजचोरी

By admin | Updated: July 13, 2017 19:58 IST

खैरखेडा परिसरातील चित्र : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास गावातील युवकच करताहेत सुरु

यशवंत हिवराळे / राजुरा लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा विज वितरण कंपनी कार्यालयांतर्गत येत असलेल्या खैरखेडा परिसरात घरगुती तथा शेती वापरासाठी विज वाहिणीवर खुलेआम आकोडा टाकुन मोठ्या प्रमाणावर  विज चोरी सुरु आहे. स्थानिक वायरमन तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे.खैरखेडा गावासह सुदी ,अनसिंग  परिसरात छोटेमोठे तलाव व नदीनाल्याचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. पेरणीनंतर पावसाने मोठ्या प्रमाणावर दडी मारल्याने पाणी स्त्रोतानजीकचे अनेक जण विज कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्याशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापीत करीत खुलेआम विज वाहिणीवरुन शेकडो फुट अंतरावर केबलव्दाा  आकोडा टाकुन मोठया प्रमाणात विजचोरी करीत आहेत. हा प्रकार सालाबाद रब्बी तथा खरीपाच्या पिकादरम्यान मोठ्या प्रमाणावर सुरु राहत असतांना विज वितरण कंपनीचे स्थानिक कर्मचारी तथा अधिकारी विज चोरीचा हा गोरखधंदा बंद करण्यात डोळेझाक पणा का करतात, याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत .शेती वापराच्या विज चोरीसह घरगुती वापराचीही विज चोरी या भागात मोठ्या प्रमाणात दिवस रात्र सुरु आहे. वर्षानुवर्षे अव्वाच्या सव्वा येणाऱ्या विज देयकाची प्रमाणिकपणे नियमित भरणा करणाऱ्या  नागरिकांच्या घरगुती वापराचे बिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला तरी विज पुरवठा खंडीत करणे अथवा विज मिटरच काढुन नेण्याचा धमकीवजा इशारा देणारे स्थानिक विज कर्मचारी लाखो रुपयाची होत असलेल्या विज चोरीला अभय का देतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.खैरखेडा परिसराचा बहूतांश भुभाग हा धनदार जंगल व दऱ्याखोऱ्याने व्यापलेला आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या परिसराकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते, याचाच फायदा घेत स्थानिक विज कर्मचारी विज चोरांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापीत करुन मोठ्या प्रमाणात माया गोळा करीत असल्याची चर्चा आहे. या भागातील विज पुरवठा  वारंवार खंडीत असतो, अनेकदा दोन दोन दिवसही  विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे0 येथे नेमणुक असलेले वायरमन  मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा  गावातील अप्रशिक्षीत युवकांनाच आपला जीव धोक्यात घालुन  विज पुरवठा सुरु करावा लागत असल्याचे वास्तव आहे. विज चोरी करणारे शेकडो फुट अंतरावर उघड्यावरच केबल, स्टार्टर,  टाकुन विज पुरवठा  होत असल्याने एखादा जबर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी पाहणी करुन हा विज चोरीचा प्रकार थांबविणे गरजेचे आहे.