शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाचा लळा लावणारा ध्येयवेडा शिक्षक

By admin | Updated: September 4, 2014 22:58 IST

कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल खाडे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाच कृतीतून शिकविले.

वाशिम : गत ९ वर्षाआधी पडलेल्या भिषण दुष्काळात अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल खाडे यांनी सर्वप्रथम आपल्या घरी व नंतर शाळेत पक्ष्यांसाठी नियोजनबध्द विद्यार्थ्यांनासोबत घेवून पाणवठे व अन्नछत्र तयार केले, ते आजतागायत सुरू आहे. आजच्या घडीला शिक्षक खाडे यांना याकडे लक्ष देण्याची गरज राहीलेली नाही, कारण विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाचा एवढा जबरदस्त लढा खाडे यांनी लावला की विद्यार्थ्यांचा दिनचर्या पक्ष्यांच्या व्यवस्थेपासून सुरू होत आहे.गोपाल खाडे यांनी पक्ष्यांसाठी केलेल्या सुविधांचा दररोज शेकडो पशु-पक्षी लाभ घेवून आपली तहान व भूक भागवित आहेत.वाढते प्रदूषण, मोबाईलच्या ध्वनीलहरी, विषारी किटकनाशक, सिमेंटच्या घरांमुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी दुरापास्त होण्याच्या मार्गावर आहेत. यात कामरगाव येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी तत्कालीन विद्यार्थ्यांसोबत पशु-पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा प्राप्तीसाठी सुरू केलेल पानवठे व अन्नछत्र तयार करून आपल्या आगळया-चेगळया भुतदयेचा परिचय दिला. त्या विद्यार्थ्यांचा उपक्रम गत ९ वर्षांपासून शाळेतील नवनविन विद्यार्थी मोठया आनंदाने राबवित आहेत. विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतरही तो आपल्या घरी सुध्दा असा उपक्रम राबवित असल्याचे शिक्षक खाडे यांनी सांगितले. वातावरणात बदल होत असला तरी उन्हाळयात विदर्भाचे तापमान जास्त असल्याने छोटे पक्षी, प्राणी यांचे जीवन दुष्कर होते, मोठया जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. मात्र छोटे छोटे पशु - पक्षी दुष्काळात होरपळून निघतात. पावसाळयात घरटे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी उभारल्या जातात. वाशिम जिल्हयातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गत ९ वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळात होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बधितले. या लहान बालकांचे संवेदनशिल मन कळवळले व त्यांनी विद्यालयाचे शिक्षक गोपाल खाडे, प्रा. रमेश वरघट यांच्याशी चर्चा केली. गोपाल खाडे यांनी या विद्यार्थ्यांना घेवून एक छोटेखानी कार्यशाळेची आखणी केली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना वेस्टेज पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक बरण्या, दोरी, सुतळी, तार व इतर साहित्य गोळा करून विद्यार्थ्यांना ह्यबर्ड फिडरह्ण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. शिक्षकांनी स्वखर्चातून मातीची भांडी विकत आणली. याव्दारे जागोजागी पानवटे लावलीत आज येथे २00 च्या वर पानवटे असून शेकडो पक्षी येतात व आपली तहान व भूक भागवितात. तसेच पशु पक्ष्यांना लागणारे खाद्य सुध्दा लटकविलेल्या बरणीत ठेवल्याने आज येथे कावळा, बुलबुल, मैना, चिमणी, सूर्यपक्षी, खारूताई सारखे छोटे प्राणी येवू लागले. विद्यार्थ्यांंनी पक्षी व खारू ताईसाठी कडधान्य, बिस्कीटे बरण्यामध्ये ठेवायला सुरूवात केली आज कोणालाही न घाबरता पशु-पक्षी येथे बिनधास्त आपले घर समजून ते खातांना दिसून येतात. हा उपक्रम सुरू करण्याकरीता मुख्याध्यापक मधूसूदन बांडे, शिक्षक वसंतराव चव्हाण यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व ते आजही लाभत आहे. विशेष म्हणजे गोपाल खाडे उत्कृष्ट चित्रकार, विज्ञान विषयाचे अभ्यासक असणारे व सामाजिक बांधीलकी जपणारे शिक्षक आहेत.