शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांवर कृषिपंपांना ‘आॅटो स्विच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:58 IST

महावितरणचे प्रयत्न निष्फळ

ठळक मुद्दे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील तब्बल ४० हजारांच्या आसपास कृषिपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविण्यात आलेले असून, यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र  जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मे-जून २०१७ या महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबविली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला  नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो  स्विच’ बसविले आहेत, त्यापैकी महावितरणला प्रयत्नांती १० हजार आॅटो स्विच हटविण्यात यश मिळाले; परंतु ४० हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न अद्याप कायम आहे. तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’द्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकºयांनी हा  प्रकार अवलंबिला आहे. मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच विजेची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय रोहित्र जळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. शेतांमधील  मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने संबंधित शेतकºयांनी आपापल्या मोटारपंपाचे ‘आॅटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषिपंपधारक शेतकºयांकडे विजेची २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. ती वसूल होणे कठीण झाले असतानाच सुमारे ४० हजार कृषिपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. - पी.के.चव्हाण, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम