वाशिम : जिल्ह्यात आजमितीला तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहीती प्राप्त झाली आहे. परिणामी, शे तकर्यांसमोर सिंचनाचा भिषण प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसू येत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळर्णी यांनी जलाशयांमधील पिण्यासाठी आरक्षित करून शेष पाणीसाठा सिंचनासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कृषी वीजपंपाच्या रखडलेल्या जोडण्यांनी शेतकर्यांच्या साडेसातीमध्ये भर घातली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीजजोडण्या अद्यापही प्रलंबित आहेत. संबधित शेतकर्यांनी महावितरण कंपनीकडे कोटेशन व पैसे भरले. मात्र, महावितरणच्या स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांचे आदेश नसल्यामुळे वीज जोडण्या देण्या त प्रशासन असर्मथ होते असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. याचा फटका मात्र, शेतकर्यांना सोसावा लागत आहे. दरम्यान कृषीपंपाच्या जोडण्यांसाठी ९५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असुन महावितरणने वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोजगार हमी योजनेतील पंचायत समितीच्या वतीने भरण्यात आलेले १७६ कोटेशन महावितरणला प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ५0 शेतकर्यांनाच कृषीपंप जोउण्या देण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित १२६ शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणचे अतिरिक्त कार्यक ारी अभियंता एन. जी ममतानी यांनी आगामी १५ दिवसात या सर्व कामांना प्रारंभ होणार असुन एप्रिल २0१५ पर्यंत सर्व प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्याचे काम पुर्ण होणार आहे. महावितरणे यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार केला असुन कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाच्या जोडण्या रखडल्या !
By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST