शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी येथील कृषी उत्पन्न उपबाजारची इमारत अडगळीत

By admin | Updated: August 5, 2014 20:10 IST

मेडशी येथील उपबाजाराची दुरवस्था थांबता थांबेना, अशी गत झाली आहे.

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेडशी येथील उपबाजाराची दुरवस्था थांबता थांबेना, अशी गत झाली आहे. कृउबासच्या इमारतीचे दरवाजे व खिडक्या काढून नेण्यात आल्या आहेत. उपबाजाराच्या आवारात असलेल्या कुंपनाचे अँगल व तारेचे अवशेषही शिल्लक नाहीत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीला आणण्यासाठी सोयीचे जावे म्हणून गावपातळीवर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत उपबाजार स्थापन केले जातात. याप्रमाणेच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शिरपूर व मेडशी येथे उपबाजार समितीची निर्मिती केली आहे. शिरपूर येथे बर्‍यापैकी उपबाजार सुरू असतो. शिरपूरच्या उपबाजाराला स्वतंत्र जागा, इमारत, कुंपन आहे. शिरपूर परिसरातील हजारो शेतकरी या उपबाजारात शेतमाल विक्रीसाठी आणतात. मात्र, मेडशी येथील उपबाजार समितीच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. मेडशी कृउबासच्या उपबाजाराची चार एकर जमीन आहे. या जमिनीत उपबाजाराच्या सभोवताल तारेचे कुंपन करण्यात आले होते. त्या कुंपनाचे अवशेषही आता शिल्लक नाहीत. या उपबाजारातील इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीला दरवाजे व खिडक्या नाहीत. इमारतीत घाणीचे साम्राज्य आहे. कृउबासने या उपबाजारातील इमारत व कुंपनाची देखभाल व्यवस्थित करणे गरजेचे होते. आता या इमारतीची दुरुस्ती त्वरित करण्याची गरज आहे. उपबाजाराच्या आवाराला तारेचे कुंपन करण्याची गरज आहे. मध्यंतरी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने मेडशी येथे गोदाम भाड्याने घेउन शेतमालाची खरेदी सुरु केली होती. गावापासून दूर अंतरावर उपबाजार असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे गोदामाच्या भाड्याचा जास्तीचा भुदर्ंड सहन करून कृउबासने मध्यंतरी शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला होता. आता उपबाजाराच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीची दुरुस्ती करुन शेतमाल खरेदी सुरू करणे गरजेचे आहे. मेडशी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना या उपबाजारामुळे दिलासा मिळाला होता. सदर उपबाजाराची इमारत दुरूस्त करणे गरजेचे आहे.