शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरणार!

By admin | Updated: March 19, 2017 02:38 IST

वाशिम जिल्ह्यातील कृषी सहायकांची नऊ रिक्त पदे या पद्धतीने भरली जाणार आहेत.

वाशिम, दि. १८-राज्यातील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्‍चित वेतनावर भरण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या असून, वाशिम जिल्ह्यातील कृषी सहायकांची नऊ रिक्त पदे या पद्धतीने भरली जाणार आहेत. कृषी विभागामध्ये विविध प्रवर्गातील मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असून, निर्धारित वेळेत कामे पूर्ण होणे अवघड जात असल्याने ही रिक्त पदे भरण्याची मागणी राज्यातील जिल्हा कार्यालयाकडून सतत करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करून शासनाने राज्यात रिक्त असलेली कृषी सहायकांची पदे कृ षी सेवक म्हणून निश्‍चित वेतन प्रणालीनुसार भारांकन पद्धतीने भरण्याचे निश्‍चित केले आहे. राज्यात रिक्त असलेली कृषी सहायकांची ७३0 रिक्त पदे याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यामध्ये उमेदवार हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असला तर त्याला शंभर टक्के भारांकन, कृषी पदवी/ पदविका प्राप्त केली असेल, तर शंभर टक्के भारांकन, तसेच ज्या उमेदवारांनी दहावी परीक्षेसह कृषी पदवी/ पदविका प्राप्त केली असेल, त्याला दोन्ही मिळून २00 भारांकन आणि ज्या उमेदवारांनी कृषी पदवी आणि पदविका हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केले असतील, अशा उमेदवारांनी दोन्हीपैकी ज्या अभ्यासक्रमात जास्त टक्केवारी प्राप्त केली आहे, ती ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय शासनाच्या ५ ऑक्टोबर २0१५ च्या निर्णयातील तरतुदी, तसेच २९ डिसेंबर २0१५ च्या जाहिरातीनुसार इतर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रि येंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता यादी सुधारित करून प्रसिद्ध करण्याची कार्यवाही संबंधित विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार कृषी सहायकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरण्यात येत आहेत. ही प्रक्रिया थोडी लवकर पूर्ण झाली, तर आमच्याकडील मनुष्यबळ वाढून कामे लवकर होण्यास आधार होईल. जिल्ह्यात कृषी सहायकांची नऊ पदे रिक्त आहेत. - दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम