शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:25 IST

मंगरूळपीर: महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकारमंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले

नाना देवळे । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देवुन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळुन आले.चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत या शेतकर्‍याने यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी-विक्री समितीमधून  ८  जून २0१७ रोजी अनुदानाचे तीन बॅग सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्यांनी महाबिजच्या ९३0५ या वाणाची पेरणी केली. काही दिवसांनी बियाणे चांगले उगवले. परंतु सुरुवातीला रोपे लहान असतांना त्यांना त्यामध्ये मिश्र वाण असल्याचे दिसले नाही. पंरतु रोपे मोठी झाल्यानंतर काही रोपांची पाने लांबट असल्याचे दिसून आले तर काही पाने गोलसर असल्याचे दिसून आले. या सोयाबीन बियाण्यासह दुसर्‍या वाणाचेही रोपे असल्याचे आढळुन आले. याबाबत शेतकर्‍याने संबंधित विभागाकडे तक्रारही नोंदविली होती. तसेच यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी शेतकरी गोविंदा मोतीराम भगत यांच्या चांभई येथील शेतास भेट देवुन उगविलेल्या सोयाबीन बियाण्याची पाहणी केली. यावेळी कृषी शास्त्रज्ञ भरत गिते, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, महाबिज सहाय्यक क्षेत्र अधिकारी एस.बी.नवगण, कृषी सहाय्यक निरंजन महल्ले उपस्थित होते. या चमुने केलेल्या पाहणीत सोयाबीनच्या पिकात शेतकर्‍याने मागितलेल्या ९३0५ या वाणाचे प्रमाण केवळ ३0 टक्के तर इतर वाण ७0 टक्के वाण असल्याचे आढळुन आले. ९३0५ वाण लवकर येणारे आहे. येत्या महिन्याभरात ९३0५ वाण काढणीवर येईल तर इतर वाणाची झाडे हिरवी राहतील. यामध्ये सोंगणी करतांना पंचाईत होणार आहे. त्यामुळे एक लाख रुपये भरपाई देण्याची मागणी गोविंद भगत यांनी यावेळी केली.