जिल्ह्यात पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने विविध मागण्यांसाठी १६ जुलै २०२१ पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात पशुपालक त्रस्त झाले. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना लसीकरण व इतर सेवा देणे आवश्यक असताना हे कामबंद आंदोलन संयुक्तिक व नियमाला धरून नाही. कामबंद आंदोलन तत्काळ मागे घेऊन गोपालकांच्या पशुधनास सेवा पुरविण्यात यावी अन्यथा शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने २२ जुलै रोजी दिला होता. मात्र, न्यायोचित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने केला असून, आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही २७ जुलै रोजी दिला. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आता कोणती भूमिका घेते, आंदोलन सुरू ठेवणाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करणार, की मौन बाळगणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कारवाईचा इशारा धुडकावून पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST